शिरपूर: वरूळ परिसरातील एका गावातून साडे 18 वर्षीय तरुणी बेपत्ता; शहर पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद
Shirpur, Dhule | Nov 25, 2025 शिरपूर तालुक्यातील वरूळ परिसरातील एका गावातून 18 वर्षे 5 महिने वयाची व 11 वीचे शिक्षण घेणारी एक तरुणी बेपत्ता झाली असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात 25 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.दाखल तक्रारीनुसार, 24 नोव्हेंबर रोजी रात्री कुटुंबीयांसोबत जेवण करून तरुणी नेहमीप्रमाणे झोपली होती. मात्र तिचा 22 वर्षीय भाऊ 25 नोव्हेंबर रोजी पहाटे 5 वाजता उठला असता,बहीण झोपलेल्या ठिकाणी आढळून आली नाही.पुढील तपास पोहेकॉ मनोज पाटील हे करीत आहेत.