सेलू: देशी दारूची अवैध वाहतूक; सेलडोह येथे सिंदी रेल्वे येथे पोलिसांकडून ९० हजारांचा दारूचा मुद्देमाल जप्त
Seloo, Wardha | Nov 20, 2025 अवैध दारू वाहतूक करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी रंगेहात पकडून तब्बल ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लकी सचिन मसराम (वय २१, रा. वॉर्ड क्र. ०५, गोंड मोहल्ला, वर्धा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई पोलिस स्टेशन सिंदी रेल्वेच्या पथकाने दिनांक १९ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता सेलडोह येथे केली. अशी माहिती ता. २० गुरुवारला सिंदी पोलिसांनी दिली.