उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्यात तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न; बार्शी नाका परिसरात घडला प्रकार
Beed, Beed | Sep 17, 2025 राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे आज बुधावर दि.17 सप्टेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर आले आहेत.या दौऱ्यात सकाळी 8:30 वाजता, बीड शहरातील बार्शी नाका परिसरात एक धक्कादायक घटना घडली. काही तरुणांनी थेट उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात घुसून अंगावर पेट्रोल ओतत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस प्रशासनाने वेळीच, पावले उचलून तात्काळ कारवाई केली आणि त्या तरुणांना ताब्यात घेतले. त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली.या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल