नाशिक: मुंबई नाका भागातील द्वारका सर्कल येथे मोटरसायकल घसरल्याने एकाचा मृत्यू
Nashik, Nashik | Sep 16, 2025 मुंबई नाका भागातील द्वारका सर्कल येथे मोटरसायकल घसरल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून मुंबई नाका पोलीस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मनोज साहेबराव पवार वय 44 राहणार शुभ अपार्टमेंट, आकाश पेट्रोल पंपाजवळ, म्हसरूळ हे त्यांच्या मोटरसायकलवर पाथर्डी फाटा ते द्वारका भागातून जात असताना द्वारका सर्कल येथे मोटरसायकल घसरल्याने त्यांच्या डोक्याला हातापायांना गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात दाखल केल्यास डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.