पुणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक-२ ने थेऊर फाटा येथील कांबळेवस्ती भागातील बनावट आरएमडी गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावर मोठी कारवाई करत एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गोदामावर छापा टाकताना बनावट आरएमडी गुटखा, सुगंधीत तंबाखू, विमल गुटखा पान मसाला तसेच मोठ्या प्रमाणात कच्चा माल पोलिसांच्या हाती लागला.