नरखेड: नरखेड हद्दीत पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थित करण्यात आला भव्य रूट मार्च
Narkhed, Nagpur | Nov 27, 2025 आगामी नगरपरिषद नगरपंचायत निवडणूक 2025 असल्याने नागपूर ग्रामीण जिल्हा अंतर्गत निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता आज पोलीस स्टेशन नरखेड अंतर्गत रूट मार्च काढण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार व अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के उपस्थित होते. यावेळी गांधी चौक येथे जमाव व्यवस्थापनासाठी दंगा काबू योजनेबाबत सराव घेण्यात आला.