सिन्नर: नायगाव येथे सराफाच्या दुकानातून ६२ हजारांची चोरी
Sinnar, Nashik | Nov 30, 2025 सिन्नर तालुक्यातील नायगाव येथे भगवंत विनायक घेवरीकर यांच्या सुनील ज्वेलर्सचे शटर तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. त्यांनी सीसीटीव्ही डीव्हीआर काढला आणि वीज कनेक्शन तोडले. त्यानंतर सोन्या-चांदीचे दागिने, निरंजन, ताळेबंदी, लक्ष्मी कॉईन, जोडवे, कमरेच्या साखळ्या, अंगठ्या, सोन्याची नथ, रोकड व वायफाय उपकरण असा एकूण सुमारे ६२ हजारांचा ऐवज चोरून नेला. सिन्नर पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आहेत.