केज: ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे दर वाढीसाठी आंदोलन चिघळले, माळेगाव पॉईंटवर अनेक वाहतूक करणारे ट्रॅक्टर रोखले
Kaij, Beed | Nov 29, 2025 केज तालुक्यासह परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवरून आज आंदोलनाला तीव्र स्वरूप प्राप्त झाले. ऊसाला पहिली उचल किमान ३ हजार रुपये प्रति टन देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. केज तालुक्यातील माळेगाव पॉईंट येथून साखर कारखान्यांकडे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर शेतकऱ्यांनी अडवून धरले. सध्याचा जाहीर दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याचे सांगत "जोपर्यंत पहिल्या उचलांची रक्कम वाढवली जात नाही, तोपर्यंत ऊस वाहतूक होऊ देणार नाही," अशी भूमिका आह