राधानगरी: देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांचा राधानगरी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा
देवस्थान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय किसान सभेच्या वतीने आज बुधवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता राधानगरी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. अंबाबाई मंदिरापासून काढण्यात आलेली रॅली तहसील कार्यालयावर धडकली आणि घोषणांनी परिसर दणाणून टाकण्यात आला. राधानगरी तालुक्यात सुमारे ३५०० एकर देवस्थान शेतजमीन असून ती हजारो शेतकरी अनेक वर्षांपासून कसत आहेत.