खुलताबाद: खुलताबादमध्ये मतदार सज्ज, यंत्रणा सज्ज, उद्या १४,७७५ मतदार बजावणार लोकशाहीचा हक्क
खुलताबाद नगरपरिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान होत असून प्रशासकीय व पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. शहरातील १९ मतदान केंद्रांवर १४,७७५ मतदार लोकशाहीचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी केंद्रप्रमुख, अधिकारी व मास्टर ट्रेनर्सची फळी तसेच बॅलेट आणि कंट्रोल युनिटची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. महिलांची मतदारसंख्या पुरुषांपेक्षा अधिक असल्याने त्यांचा कौल निर्णायक ठरणार आहे. शांततेत मतदान पार पडावे यासाठी १ पोलीस उपअधीक्षक, १ पोलीस निरीक्षक, ७ एपीआय/पीएसआय, ७७ पोलीस तैनात असतील.