आज दि 5 नोव्हेंबर सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजीनगर महावितरणकडून वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर लावणे बंधनकारक असल्याचे पत्र देण्यात आल्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने याविरोधात आज जोरदार निदर्शने केली. मुख्यमंत्री स्वतः यांनी स्मार्ट मीटर ऐच्छिक असल्याचे स्पष्ट केले असतानाही महावितरण नागरिकांवर दबाव आणत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. “मुख्यमंत्री खरे बोलत आहेत की महावितरण?” असा थेट सवाल करत आंदोलनकर्त्यांनी स्मार्ट मीटर बंधनकारक करण्याचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी केली.