लातूर: नागरिकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस काम करणार, मतदारांनी साथ द्यावी. माजी आ.धिरज देशमुख यांचे पत्रकार परिसहेदेत आवाहन
Latur, Latur | Nov 29, 2025 लातूर -रेणापूर नगरपंचायतीतील प्रलंबित विकासकामे, त्यासाठी आलेल्या निधीचा अपव्यय, भ्रष्टाचार आणि निवडणूक प्रक्रियेत भाजपकडून होत असलेल्या दबाव तंत्रांविरोधात शनिवारी (दि. २९ ) माजी आमदार धिरज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर भूमिका मांडली व विकास कामात झालेल्या नगरपंचायतीच्या भ्रष्ट कारभारावर थेट सवाल उपस्थित करून निवडणुक काळात भाजपकडून होत असलेल्या डावपेचांवर जोरदार प्रहार करून भाजपच्या नगरअध्यक्ष पदाच्या उमेदवाराचे घर सरकारी जमिनीवर असल्याचा गंभीर आरोप देशमुख यांनी केला.