अलिबाग: आम्ही लोकांसोबत, शेकापसोबत आघाडीला तयारी
प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू
Alibag, Raigad | Nov 12, 2025 स्थानिक पातळीवर कुणाशी युती करायची काय भूमिका घ्यायची याचे अधिका देण्यात आले आहेत. आम्ही बरेच दिवस आंदोलनात असल्याने आमची निवडणूकीच्या दृष्टीने तयारी झालेली नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर परीस्थिती बघून लढू. रायगड जिल्ह्यात देखील निवडणूका लढवण्याची आमची इच्छा आहे. जिल्हयात शेकापबरोबर आघाडी करण्यात आम्हाला काहीच अडचण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणुकांमधील त्यांच्या भूमिकेबद्दल बच्चू कडू यांनी थेट भाष्य केले आहे.