दर्यापूर येथील मतदान केंद्रांना जिल्हाधिकारी यांची भेट अमरावती, दि. २: नगर परिषद निवडणूक मतदानानिमित्ताने जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दर्यापूर येथे भेट दिली. दर्यापूर नगरपरिषद निवडणुकांच्या पारदर्शकता व सुरळीत अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांनी आज दर्यापूर नगरपरिषदेतील मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी श्री. येरेकर यांनी मतदार केंद्र परिसरात सुरू असलेल्या मतदान प्रक्रिया, सुरक्षा व्यवस्था, दिव्यांग मतदारांसाठी व्यवस्था आदी सुविधांचा सविस्तर आढावा घेतला.