मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे, अनुसूचित जाती उपवर्गीकरण (अ-ब-क-ड) तात्काळ लागू करावे तसेच समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या मार्गी लावाव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी मुंबई ते नागपूर अशी भव्य पायी पदयात्रा निघाली असून लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांच्या नेतृत्वात ही पदयात्रा धामणगाव रेल्वे येथे दाखल झाली.संपूर्ण महाराष्ट्रात गावोगावी, शहरोगावी मातंग समाज मोठ्या उत्साहाने या पदयात्रेचे स्वागत करीत आहे. धामणगाव रेल्वे शहरातही समाज बांधवांनी ढोल-ताशांच्या गजरात