सेलू: बोथली येथे ग्रामसभेचे आयोजन; पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता व आरोग्य विषयांवर चर्चा, विकासकामांना गती देण्याचे आश्वासन
Seloo, Wardha | Nov 28, 2025 ग्रामपंचायत बोरखेडी अंतर्गत येणाऱ्या बोथली गावात ता. २८ शुक्रवाराला दुपारी १२ वाजता ग्रामसभेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच अनिल जिकार होते. गावकऱ्यांच्या समस्या, गरजा आणि विकासकामांबाबत या सभेत सविस्तर चर्चा झाली. उपस्थित नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी विकासाचा मार्ग आखण्यास एकत्रित सहभाग नोंदवला.