सेनगांव तालुक्यातील गोरेगांव या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्तिकी एकादशीनिमित्त भव्यदिंडी सोहळा आयोजित करण्यात आला. या दिंडी सोहळ्यामध्ये भाविकभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गोरेगांव येथील प्रमुख मार्गाने सदरचा दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला असून टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला.