चंद्रपूर : चंद्रपूर रेल प्रवाशी संस्थेने चंद्रपुरातील रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्यांना घेवून आज दि.4 डिसेंबरला श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत रेल्वे प्रवाशांना विविध समस्यांना सामना करावा लागत असल्याचे सांगितले. चंद्रपूर रेल्वे स्टेशन वरुन नियमित गाडी जाण्यासाठी यापूर्वी सुद्धा आंदोलन करण्यात आले होते. परंतु रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. चंद्रपूरहून पुणे आणि मुंबईला जाणाऱ्या गाड्या अजूनही आठवड्यातून एकादाच धावत आहेत. मात्र ही रेल्वे गाडी नियमित प्रति दिव