सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल,अमरावतीत पहिल्यांदाच दुर्मिळ ‘कार्सिनोसार्कोमा’ गर्भाशय कॅन्सरवर दूरबीन लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया यशस्वी. स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) अमरावती येथे प्रथमच अत्यंत दुर्मिळ आणि जटिल असलेल्या कार्सिनोसार्कोमा (Malignant Mixed Müllerian Tumour) या गर्भाशयाच्या कॅन्सरवर दूरबीन लॅप्रोस्कोपिक पद्धतीने यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सदर रुग्ण ही 65 वर्षाची महिला असून यवतमाळ येथील रहिवासी आहे.