चिखली: *दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघे गंभीर जखमी; इसोली आणि कोनड खुर्द परिसरात भीषण घटना..! जनावर व मोटारसायकलस्वार धडकून अपघात!
तालुक्यात दोन स्वतंत्र अपघात घडून दोघे गंभीर जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एकीकडे सासुरवाडीकडे मुलाला बघण्यासाठी जात असताना मोटारसायकलला रोही जनावराने दिलेल्या धडकेत तरुण गंभीर जखमी झाला, तर दुसऱ्या घटनेत भरधाव मोटारसायकलस्वाराने पादचाऱ्याला जोरदार धडक देत फरार झाल्याने आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे.