राहुरी: राहुरी-वांबोरी रेल्वे बोगद्याजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली
राहुरी-वांबोरी रेल्वे मार्गावरील बोगद्याजवळ आज सायंकाळी उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अपघात झाला. अचानक समोरील नियंत्रण सुटल्याने ट्रॉली रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून मोठी जीवितहानी टळली आहे.अपघातानंतर रस्त्यावर उसाचा खच पडल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती. स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी भेट देत ट्रॉली बाजूला करण्याचे काम सुरू केले.