धनकवडीतील बालाजीनगर परिसरात एलोरा पॅलेसजवळ रात्री उशिरा एका तरुणावर जुन्या वादाच्या कारणावरून गंभीर हल्ला करण्यात आला. फिर्यादी कुल्पी गाडीवर काम करत असताना ओळखीच्या व्यक्तींनी शिवीगाळ करत धारदार हत्याराने वार करून त्याला गंभीर जखमी केले. या प्रकरणी आदित्य काका गायकवाड (१९, रा. धायरी) यास अटक करण्यात आली असून दोन विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. एक अनोळखी इसम फरार आहे.