जळगाव: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' अभियान सुरू; केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचे मार्गदर्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त, १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या पंधरा दिवसांच्या कालावधीत जिल्हाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांच्या मालिकेत 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' या विशेष आरोग्य अभियानाचा शुभारंभ बुधवारी १७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता करण्यात आला. या अभियानात ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रत्येक महिलेची आरोग्य तपासणी केली जाईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी दिली.