खामगाव: खामगाव नगर पालीका निवडणूक सुरु झाली असून आज पासून नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आज एकही अर्ज दाखल नाही
नगर पालीका निवडणूक सुरु झाली असून आज दिनांक १० नोव्हेंबर पासून नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र आज दिनांक १० नोव्हेंबर रोजी पहिल्या दिवशी दुपारी.२ वाजेपर्यंत खामगाव न.प.मध्ये एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती प्राप्त झाली.नऊ वर्षानंतर होत असलेल्या नगर पालीका निवडणूकीची प्रक्रिया आजपासून खऱ्या अर्थाने प्रारंभ झाली आहे. न.प. निवडणूकीमुळे राजकारण तापायला लागले असून आगामी काही दिवसात राजकीय वातावरण आणखी तापणार आहे.