आगामी नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मुख्याधिकारी गट संवर्गातील अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये कोरेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनोद जळक यांची सातारा नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांच्या स्वाक्षरीने राज्य शासनाने मंगळवारी सायंकाळी पाच वाजता काढलेल्या आदेशानुसार एकूण ६५ अधिकाऱ्यांच्या पदस्थापना करण्यात आल्या आहेत.