हवेली: उरुळी कांचन येथे रॉंग साईडने निघालेल्या स्विफ्टची शिवसाई बसला जोरदार धडक; चालक गंभीर जखमी..
Haveli, Pune | Nov 28, 2025 पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील खेडेकर मळा परिसरात रॉंग साईडने निघालेल्या स्विफ्ट कारने शिवशाही बसला जोरदार धडक दिल्याची घटना घडली.या अपघातात स्विफ्ट गाडीचा चालक गंभीर झाला आहे. गुरुवारी (ता. 27) संध्याकाळी सव्वा नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.