राहुरी नगर परिषद निवडणुकीदरम्यान तनपुरे गटाच्या प्रचार फलकावर अज्ञात व्यक्तींनी काळे फासल्याची घटना घडली आहे. या प्रकाराचा युवा नेते अक्षय कर्डिले यांनी तीव्र निषेध नोंदवला आहे.या प्रकरणातील आरोपी शोधून त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली.घटना नेमकी कोणाकडून घडली हे अद्याप स्पष्ट नसताना, थेट विरोधकांवर आरोप करणे योग्य नसल्याचे कर्डिले यांनी नमूद केले.