आष्टी: दुचाकी ची धडक... गोपालक शेतकरी गंभीर जखमी.. उपचारादरम्यान झाला मृत्यू.. धाडी बस स्थानक परिसरातील घटना..
Ashti, Wardha | Nov 30, 2025 गाडी बस स्थानक परिसरात गोपालक शेतकरी उभा असताना अज्ञात दुचाकी भरधाव वेगाने येऊन शेतकऱ्याला जबरदस्त धडक दिली त्यामुळे तो गंभीर जखमी झाला ही घटना दिनांक 28 ला रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान घडली गंभीर जखमी असलेल्या गुराख्यास अमरावती येथे उपचाराला दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गोपाल प्रभाकर चचाने असे या गोपालकाचे नाव आहे या घटनेची आष्टी पोलिसांनी नोंद केली असून तपास सुरू असल्याची माहिती आज दिली