खामगाव: खामगाव नगर पालीकेचे कारभारी निवडण्यासाठी होत असलेल्या न.प. निवडणूकीचा रणसंग्राम सुरू
खामगाव नगर पालीकेचे कारभारी निवडण्यासाठी होत असलेल्या न.प. निवडणूकीचा रणसंग्राम खऱ्या अर्थाने दिनांक सोमवार १० नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे. १० नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. यामुळे नगर पालीका निवडणूकीचे वातावरण तापायला लागले असून पहिल्याच दिवशी कोण-कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार याची उत्सुकता लागली आहे. तब्बल ९ वर्षानंतर नगर पालीका निवडणूकीचा बिगूल वाजला आहे. निवडणूक विभागाने निवडणूकीच्या तारखांची घोषणा केल्यापासून आदर्श आचार संहिता लागू.