ठाणे: भाईंदर स्टेशन परिसरात युवक काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
Thane, Thane | Sep 17, 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आज भाजपकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. विविध ठिकाणी वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. अशातच आज दिनांक १७ सप्टेंबर रोजी दुपारी ४ च्या सुमारास भाईंदर रेल्वे स्टेशन परिसरात युवक काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मिरा भाईंदर युवक काँग्रेसने भाईंदर स्टेशन परिसरात ' happy birthday वोट चोर' असे फलक दर्शवले आहेत.