भंडारा येथील तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आणि वेतन पथक अधीक्षक (माध्यमिक) यांच्या अनियमिततेसह, शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात एका संस्थाचालकाचा मृत्यू झाल्याच्या गंभीर मुद्द्यावर आमदार सुधाकर अडबाले यांनी १४ डिसेंबर रोजी सकाळी ११.०० वा. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली. अडबाले यांनी या घटनेसाठी संबंधित अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आणि त्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी सभागृहात केली आहे.