राहुरी फॅक्टरी येथील ताराबाद रोड परिसरातील मेडिकल दुकान अज्ञात चोरट्याने फोडून चोरी केल्याची घटना घडली आहे .आज रविवारी पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली असून सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. गेल्या काही दिवसापासून या परिसरामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यात चोरट्यांनी आता दुकानांना लक्ष केल्याने व्यापारी वर्गात घबराट पसरली आहे. सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे चोरट्यांनी शोध सुरू केला आहे.