दिंडोरी: वरखेडा वनी व पांडाणे येथील चंपाषष्ठी निमित्ताने खंडेराव महाराज यात्रा संपन्न
Dindori, Nashik | Nov 27, 2025 दिंडोरी तालुक्यातील वरखेडा वनी व पांडाणे येथे चंपाषष्ठी निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते चंपाषष्ठीच्या दिवशी सकाळपासूनच खंडेराव महाराजांच्या मंदिरामध्ये एकच प्रचंड गर्दी पहावयास मिळाली. तसेच रात्रभर जागरण गोंधळ व चार वाजता रहाळ खेळून नंतर लंगड तोडून कार्यक्रमाची सांगता करण्यात आलीची माहिती खंडेराव भक्त देविदास वाघ यांनी दिली आहे .