साकोली: साकोली नगरपरिषद कार्यालयात मतदार यादी बघण्यासाठी व एक विक्रीसाठी उपलब्धः मुख्याधिकारी यांची माहिती
दिनांक 31/10/2025 ला प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीनंतर दि.06/11/2025 ला दुरुस्ती मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.ही यादी न.प.कार्यालयात बघण्यासाठी व विक्रीसाठी उपलब्ध आहे.तरी नामनिर्देशन दाखल करताना अंतिम मतदार यादी व दुरुस्ती मतदार यादी अशा एकत्र यादीचा विचार करून उमेदवार/सूचक यांच्या अचूक क्रमांकासहीत दाखल करावा.अशी माहिती नगरपरिषद येथे मुख्याधिकारी तथा प्राधिकृत अधिकारी मंगेश वासेकर यांनी मंगळवार दि11नोव्हेंबरला सायंकाळी5वाजता प्रसिध्दिपत्रकाद्वारे दिली आहे