नागपूर शहर: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल आता 21 डिसेंबरला ; मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचा निर्णय
नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निकाला संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. आता या निवडणुकीचे निकाल निर्धारित तारखांवर जाहीर न करता, 21 डिसेंबर रोजी संपूर्ण राज्यात एकाच वेळी घोषित केले जातील. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे.