राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील आरडगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन मेंढ्या आणि एका कोकराला जीव गमवावा लागल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील शेतकरी संजय साळुंके व संतोष साळुंके यांच्या वस्तीशेजारील शेतात मेंढपाळाची मेंढरे चरत असताना बिबट्याने धाड टाकून त्यांना फस्त केल्याची घटना घडली या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा गुप्त संचार असल्याच्या चर्चा सुरू असून काही ठिकाणी त्याचे प्रत्यक्ष दर्शनही झाल्याचे ग्रामस्थांनी कडून सांगण्यात आले आहे.