आंबेगाव: मंचर शहरात सलग तिसऱ्या दिवशी देखील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Ambegaon, Pune | Oct 30, 2025 माजी गृहमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंचर शहरात सुरू असलेल्या चार दिवसीय भव्य आरोग्य शिबिराने आज तिसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवत आपला 'जनसेवेचा वसा' सिद्ध केला आहे.सौ. मोनिकाताई सुनील बाणखेले आणि सुनील दामोदर बाणखेले यांच्या माध्यमातून आयोजित या शिबिरामुळे अनेक गरजू नागरिकांना मोठा लाभ होताना दिसत आहे.