सातारा: फुटका तलाव परिसरात मारुती कारची टेम्पोला जोरदार धडक; चालक फरार
Satara, Satara | Nov 10, 2025 सातारा शहरातील फुटका तलाव परिसरात रविवार, दिनांक 9 नोव्हेंबर रोजी रात्री एक अपघात घडला. मारुती कारने कार्गो टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने टेम्पो तळ्याशेजारी बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीला धडकून अडकून राहिला.या अपघातानंतर मारुती कार चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. घटनेची अद्याप पोलीस ठाण्यात नोंद झालेली नाही. या धडकेमुळे टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून तळ्याची संरक्षण भिंत देखील कोसळली आहे.