मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत राजुरा विधानसभा मतदारसंघात पुन्हा २० किलोमीटर लांबीच्या पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. स्थानिक आमदार देवराव भोंगळे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही कामे मंजूर झाली असून, या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राजुरा, कोरपना आणि गोंडपिपरी तालुक्यातील शेतकरी बांधवांना शेतमालाची वाहतूक करणे आणि शेतीत ये-जा करणे अधिक सोयीचे होणार आहे.