अकोला : जवाहर नगर परिसरात चिकनगुनियाचे रुग्ण वाढल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. दिनांक ५ नोव्हेंबर रोजी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अतुल शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी आरोग्य केंद्र, कृषी नगर अंतर्गत सखोल सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. टीमने फिव्हर व कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करून डास अळ्यांचा नाश केला व टेमिफॉस औषधाची फवारणी केली. डास निर्मूलनात नागरिकांचा सहभाग अत्यावश्यक आहे,असे मत डॉ. शंकरवार यांनी सायंकाळी ६ वाजता व्यक्त केले.