सेलू: दहेगाव (गोसावी) येथे‘संविधान प्रश्नमंजुषा 2025’ चे भव्य आयोजन; पोलीस मित्र समिती व यशवंत विद्यालय यांचा संयुक्त उपक्रम
Seloo, Wardha | Nov 29, 2025 संविधान दिनानिमित्त रक्षक संघ संलग्न पोलीस मित्र समिती, जिल्हा वर्धा व यशवंत विद्यालय, दहेगाव (गोसावी) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 29 नोव्हेंबर (शनिवार) रोजी सकाळी 11.30 वाजता ‘संविधान प्रश्नमंजुषा 2025’ या उपक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. या प्रश्नमंजुषेत वर्ग 5वी ते 12वी या गटातील तब्बल 120 विद्यार्थ्यांनी उस्ताहपूर्ण सहभाग नोंदविला.