खटाव: दुष्काळी खटाव तालुक्यात प्रति कास तलाव आकारास; वरूड सरोवराचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जलपूजन व लोकार्पण सोहळा
Khatav, Satara | Nov 9, 2025 ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून दुष्काळी खटाव तालुक्यात ‘प्रति कास तलाव’ आकारास आला असून वरूड सरोवर साकार झाले आहे. या सरोवराचे जलपूजन आणि लोकार्पण सोहळा शनिवारी सायंकाळी सात वाजता वरूड येथे मोठ्या जल्लोषात पार पडला. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते या ऐतिहासिक सोहळ्याचे जलपूजन करण्यात आले. ‘से ट्रीज’ संस्थेच्या माध्यमातून या तलावाचे रूपांतर सरोवरात करण्यात आले असून यामुळे जलसंधारणासह पर्यावरण संवर्धनात मोठा हातभार लागला आहे.