17 नोव्हेंबरला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार जबलपूर येथील केंट पोलीस स्टेशन येथे दाखल गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला अटक करण्यात युनिट पाचच्या पथकाला यश आले आहे. अटकेतील आरोपीचे नाव माजिद उर्फ मुसा बाबू खान असे सांगण्यात आले आहे. गुन्हे शाखा युनिट 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांच्या मार्गदर्शनात ही कार्यवाही करण्यात आली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी केंट पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले आहे