चंद्रपूर : जिल्ह्यातील दहा नगरपरिषद आणि भिसी नगर पंचायतीची निवडणूक होणार होती. घुग्घुसमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अपील केले होते. निकाल प्रलंबित असल्याने राज्य निवडणूक आयोगाने २९ नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशान्वये घुग्घुस नगरपरिषदेची निवडणूक स्थगित केली आहे. निवडणूक स्थगित होताच एकच खळबळ उडाली. उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी नगरपरिषद कार्यालयात धाव घेतली. प्रचाराच्या अंतिम टप्प्यातच निवडणूक स्थगित झाल्याने येथे संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, स्थगि