चंद्रपूर: चंद्रपुर महानगरपालिकेत प्रबोधनकार ठाकरे जयंती साजरी
केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे हे थोर समाजसुधारक, ख्यातनाम पत्रकार आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते होते असे प्रतिपादन उपायुक्त श्री. मंगेश खवले यांनी केले. चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मनपा मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये त्यांच्या प्रतिमेस उपायुक्त श्री. मंगेश खवले व उपायुक्त श्री. संदीप चिद्रवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.