दत्त जयंती व गीता जयंतीच्या निमित्ताने शास्त्रीनगर येथील श्री गुरुदेव दत्त मंदिरा परिसरात श्री गुरुदेव दत्त सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. भागवत कथाकार स्वामी रामेश्वरानंद जी महाराज यांच्या अमृतवाणीतून भागवत कथा श्रवण करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती.