कोरेगाव: महा ई-सेवा केंद्र चालक आता आक्रमक भूमिकेत; शासनाने मागण्या मान्य न केल्यास बुधवारपासून तीन दिवसीय कामकाज बंद आंदोलन
महा ई-सेवा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्र यांच्यासह आधार सेवा केंद्रचालकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत अखिल भारतीय महा ई-सेवा व आधार केंद्र संघटन महाराष्ट्र राज्य यांच्या कोरेगाव शाखेच्यावतीने तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांना मंगळवारी सायंकाळी साडे पाच वाजता निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे शासनाने तात्काळ मागण्यांवर तोडगा काढावा, अन्यथा दि. १२ नोव्हेंबर पासून तीन दिवसीय कामकाज बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.