कोरेगाव: निवडणूक आयोगावर सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव खेळण्याचा आरोप; महाविकास आघाडीची भूमिका ठाम : आ. शशिकांत शिंदे
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबई येथे बुधवारी दुपारी दोन वाजता पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी निवडणूक आयोगाने घाईघाईत निवडणुका जाहीर करून सत्ताधारी पक्षाचा रडीचा डाव खेळला असल्याचा आरोप केला आहे. कोर्टात याचिका दाखल असतानाच आयोगाने कार्यक्रम जाहीर करून न्यायालयाच्या निर्णयावर प्रभाव पडू नये, यासाठी हा डाव रचला गेला, असा आरोप त्यांनी केला.