कराड: नांदलापूर येथे महामार्गावर एस. टी. बस व ट्रक बंद पडल्याने वाहतूक ठप्प; वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची गरज
Karad, Satara | Nov 3, 2025 पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर नांदलापूर येथील मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेसमोर सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ट्रक आणि त्यानंतर एसटी बस बंद पडल्याने कोल्हापूरकडे जाणाऱ्या लेनवरील वाहतूक संपूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे महामार्गावर उड्डाणपूलापर्यंत वाहनांची लांबलचक रांग लागली होती. नांदलापूर परिसरातील चढावर वारंवार जड वाहनांची अडचण निर्माण होत असल्याने या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. तसेच नांदलापूरकडून उलट दिशेने बैल बाजार, मलकापूर या भागाकडे जाणारी वाहने होती.