गोरेगाव: घूमर्रा येथे धानाचे पुजने जळाले, 1 लाख 60 हजार रुपयाचे नुकसान
तालुक्यातील घूमर्रा येथे शेतशिवारात धान कापून पुजने रचून शेतात ठेवले होते.दि.25 नोव्हेंबरच्या रात्री 10 वाजेच्या दरम्यान धानाचे पूजने जळाल्याने 1 लाख 60 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. यामध्ये दोन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून केशोराव पटले यांचे 1 लाख 20 हजार रुपयाचे तर प्रीतम पटले यांचे 40 हजार रुपयाचे नुकसान झाले. याप्रकरणी योग्य चौकशी करण्याची मागणी दोन्ही शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे दिलेल्या तक्रारीतून केली आहे.